जळगाव जिल्ह्यातील पर्यटनाविषयी
पर्यटन विशेष
माहिती अपडेट करण्याचे काम चालू असल्यामुळे इथे डमी माहिती टाकण्यात आली आहे.पर्यटन स्थळांविषयी अधिक माहिती
पद्ममालय
भारतातील अडीच गणपति पिठांनपैकी अर्धपीठ गणपति क्षेत्र म्हणुन पद्ममालय क्षेत्र ओळखले जाते. हे क्षेत्र टेकडीवर वसलेले असुन, मुख्य मंन्दिराच्या आजुबाजुस दोन छोटे गणपती मंदीरे आहेत. व मंन्दिराच्या समोरील बाजुस गोविन्दं महाराजांच्या पदुका असुन पदुका समोर एक मोठी घंटा आहे. व जवळच मोठा गाभारा आहे. या गाभारयात ३-४ फुट मुशकाची कोरिव उचं अशी प्रतिक्रुति आहे. येथे दोन स्वयंभु गणेश मुर्ति आहेत. त्यातल्या एका मुर्तिची सोंड उजव्या बाजुस तर दुसर्या मुर्तिची सोंड डाव्या बाजुस आहे, दोन्हि मुर्तिनां चांदीचा मुकुट आहे. हे क्षेत्र "प्रभाक्षेत्र" नावानेही ओळखले जात असुन ते एरंडोल तालुक्या पासुन ४.८ कि.मि. अंतंराबर आहे. हे क्षेत्र गणपती आणि हनुमान मंदिरां साठि प्रसिद्ध आहे.
ओंकारेश्वर मंदीर
ओंकारेश्वर मंदीर हे जळगाव शहरातील प्रसिद्ध आणी सुदंर असे भगवान महादेव यांचे मंदीर मंदीर असुन शहरातील जय नगर परिसरत आहे. या मंदीरात शिवरात्री,श्रावण सोमवार रामनवमी तसेच गोकुळष्टमी हे प्रमुख दिवस मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.
ईच्छापुर्ति गणेश मंदीर
ईच्छापुर्ति गणेश मंदीर जळगाव शहराच्या नविपेठ या भागात, बालाजी स्वीट मार्ट समोर आहे. दररोज या मंदीरात हजारो भक्तगण दर्शनाचा लाभ घेत आसतात.
महात्मा गांधी उद्यान
शहराच्या मध्यवर्ति भागात नविन बस स्टन्ड जवळ असलेले महात्मा गांधी उद्यान हे अतिशय सुंदर आणि अतिशय प्रसिध्द आहे. या उद्यानात लहान मुलानां खेळ्ण्या करिता नवनविन साधना सोबत येथे सुंदर अश्या रंगीबेरंगी फुलांच्या बाग ही आहेत.
मेहरूण (पार्क)
शहराच्या मध्यावर्ती भागात शिरसोली रोड स्थित मेहरूण पार्क शहरातील बगिचातील सर्वात जुने असे पार्क आहे .अतिशय सुंदर व निसर्गरम्य असे वातावरण असलेले ठिकाण नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करते. या पार्क चे उद्घाटन प्रसिद्ध सिनेकलाकार पृथ्विराजजी कपूर यांच्या हस्ते झाले आहे.या पार्क मध्ये मनोरंजनाचे अनेक साधने उपलब्ध आहेत.साधारणपणे नागरिक सुट्ट्यांमध्ये किंवा रविवारी या पार्क मध्ये आपल्या सुट्ट्या घालवता व मनोरंजनाचा आनंद उपभोगतात.
जे.के .पार्क
जे.के.पार्क हा प्रकल्प काही दिवसापूर्वीच विकसित केला गेला आहे.मेहरूण पार्क जवळच असलेल्या या ठिकाणी लहान मुलांना येणे अतिशय आवडते. व त्यांचे सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. या पार्कचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील विविध प्रकारचे पशु, पक्षी, ससे,चिमण्या, पोपट. व या ठिकाणचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील तलाव. या तलावातील पाणी अतिशय शांत असून या ठिकाणच्या सुर्यास्ताचा देखावा अतिशय विलोभनीय आहे. या तलावात जवळजवळ संपूर्ण वर्षभर पाणी असते हे एक विशेष..
पाटणादेवी
पाटणादेवी हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध आसे धार्मिक स्थळ आहे. व या ठिकाणाला आतिशय प्रसिद्धी आहे. सोबतच पाटणादेवी हे महान वैज्ञानिक भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ ही आहे.