जळगाव शहर महानगरपालिके विषयी
जळगाव शहर महानगरपालिका २१ मार्च .२००३ रोजी स्थापन करण्यात आली.जळगाव शहर महानगरपालिकेचे अंदाजे एकूण ६८.७८ चौरस किमी आणि ४.६० लाख लोकांना नागरी सुविधा देण्यात येते .जळगाव शहराची लोकसंख्या ४,६०,२२८ इतकी असून त्यात स्त्रियांची संख्या २,१९,६३०, पुरुषांची संख्या २,४०,५९३ आणि इतर संख्या ५ इतकी आहे.जळगाव हे केळींचे शहर म्हणून ओळखले जाते ,महाराष्ट्रच्या एकून केळी उत्पादनात या शहराचा अर्धा वाटा आहे,जळगाव हे विमानतळ ,राष्ट्रीय महामार्ग क्र .६ आणि मध्य रेल्वे क्षेत्र शी जोडले गेले आहे.जळगाव शहरात चांगल्या औद्योगिक ,शैक्षणिक त्या बरोबर वैद्याकिय क्षेत्र आहे .