विभाग  म.न.पा. शिक्षण मंडळ

महानगरपालिका संचलित प्राथमिक शाळांची माहिती

 

1) जळगाव महापालिकेच्या अंतर्गत 23 म.न.पा. प्राथमिक (मराठी 12, उर्दू 10 व हिंदी 01) शाळा सुरु आहेत.

2) महापालिकेच्या 23 प्राथमिक शाळांमध्ये 5 मुख्याध्यापक व 140 शिक्षक कार्यरत असून 4743 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तसेच 436 सेवानिवृत्त शिक्षक, 20 सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

3) पी.एम.श्री. योजने अंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्यात महानगरपालिकेची म.न.पा.उर्दू हायस्कुल क्र.। व म.न.पा. सेंट्रल स्कुल क्र.2 या शाळांची निवड झालेली आहे.

4) सन 2023-24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत म.न.पा.उर्दू शाळा क्र.11, सुप्रिम कॉलनी, जळगाव या शाळेस प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.

5) जळगाव शहर महानगरपालिका संचलित 23 प्राथमिक शाळांमधील इ.1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मा. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जळगाव यांचेमार्फत देण्यात येतो. सदरची तांदुळ मागणी मा. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेकडे शाळांमार्फत केली जाते.

6) समग्र शिक्षा योजने अंतर्गत महानगरपालिका शाळांमधील इ.1 ली ते 8 वी मधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य- पुस्तक वाटप शाळेच्या पहिल्या दिवशी करण्यात येते.

7) समग्र शिक्षा योजने अंतर्गत महानगरपालिका शाळांमधील इ.1 ली ते 8 वी मधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुचविण्यात येतो.

8) तसेच समग्र शिक्षा योजने अंतर्गतच इ.1 ली ते 8 वी मधील विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे पुचविण्यात येतात.

9) जळगाव महापालिका शाळांचे लोक सहभागातून डिजीटलायझेशन करण्यात येत आहे. आतापर्यंत 07 शाळा डिजीटलायझेशन करण्यात आलेल्या असून उर्वरीत शाळा डिजीटल करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहे.

 

म.न.पा. शिक्षण मंडळ अंतर्गत मराठी, उर्दू व हिंदी शिक्षक संख्या व विद्यार्थी पटसंख्या