विभाग  वित्तीय विभाग

महानगरपालिकेतील वित्तीय विभाग हा मुंबई  महानगर पालिका  अधिनियम कायदा१९४९ या वर्षापासून कार्यान्वित आहे तसेच पालिकेतील लेखा परीक्षणाची पुस्तके त्याचा हिशोब ठेवण्यासाठी वित्तीय विभागाची सुरवात केली गेली आहे. महानगर पालिकेतील प्रमुख इमारतीत वित्तीय विभाग स्थापित असून मुख्य वित्तीय अधिकारी हे वित्तीय विभागाचे प्रमुख असतात. वित्तीय अधिकारी ,लेखाधिकारी , लिपिक हे मुख्य वित्तीय अधिकारी यांच्या आधिपत्याखाली आपली कामे करीत असतात मुंबई  महानगर पालिका  अधिनियम कायदा १९४९ नुसार वित्तीय विभागाची विविध प्रकारची कामे असतात.महानगरपालिकेचे वित्तीय कामकाज हे वित्तीय वर्षातच पुरे केले जाते.उदा : १ एप्रिल ते ३१ मार्च मुंबई  महानगर पालिका  अधिनियम कायदा१९४९ नुसार लेखा परीक्षणाची पुस्तके हि विविध पद्धतीने माडली जातात

कार्ये आणि कर्तव्ये

  • पालिकेत जमा झालेले पैसे गोळा करणे आणि ते पैसे महानगर पालिकेच्या बँक खात्यात भरणे .
  • पालिकेच्या खात्यात पैसे जमा करणे
  • पालिकेची एकूण जमा रक्कम आणि खर्च याचा तपशील ३१ मार्च पूर्वी तयार ठेवणे
  • कर्मचार्यंचे पगार आणि पेनंशन करणे .
  • पालिकेने ठरवून दिलेल्या आर्थिक व्यवहाराला नियंत्रित ठेवणे .
  • आयुकंतंच्या गैरहजेरीत आर्थिक प्रस्ताव पडताडून बघणे .
  • १९४९ च्या मुंबई  महानगर पालिका  अधिनियम कायदा विभाग ९३ नुसार स्थायी समिती ने ठरवलेल्या पालिका निधीचे नियोजन करणे .
  • १९४९ च्या मुंबई  महानगर पालिका  अधिनियम कायदा ९४ नुसार वार्षिक प्रशासकीय नियमावली आणि वित्तीय विभागाची कागद पत्रे तयार करणे .
  • १९४९ च्या मुंबई  महानगर पालिका  अधिनियम कायदा िभाग ९२ नुसार अधिक आलेला पैश्याची गुंतवणूक करणे .

विभागीय अधिकारी

image

विभागाचे नाव
प्रमुख अधिकारी
शिक्षण
पत्ता
संपर्क
प्रतिक्रिया